Thursday, May 10, 2012

शिकंदर हा जगत्जेता नाहीच!!!

प्रकरण पहिले:

जगत्जेता!!! याचा अर्थ आज पर्यंत अनेकांनी अनेक उदाहरणांमधून दिला आहे. सगळीच उदाहरणं अनेक थोर पुरुषांना संबोधित होतीच. त्यातल एक उदाहरणाबद्दल थोडा लिहावासा वाटला. अनेकांमध्ये "गैर" च  म्हणावा लागेल असा समज रुळलेला आहे. कदाचित कधी आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात जाणीवपूर्वक शिकवला गेला नाही, किवा पिढ्यान पिढ्या तीच चुकीची माहिती आपल्या पर्यंत येत गेली. मला बोलायचा आहे ते alexander अर्थात शिकंदर याच्याबद्दल..

शिकंदर हा जगत्जेता तर नव्हताच पण हिंदुस्थान जेता पण नव्हता. मला खूप ठिकाणी हा अनुभव आला "
 शिकंदर कोण होता?" किवा "शिकंदर बद्दल काय माहिती आहे?" हे विचारला असता " शिकंदर एक जगत्जेता राजा होता, त्यांनी हिंदुस्थान स्वारी केली आणि पुरू नावाच्या रजनी त्याला हरविले..." इतका आश्चर्य वाटला हे सारा ऐकून!! पण त्यात त्यांचीही चूक नाही. मलाही काही वर्षान पूर्वी हेच माहित होता. पण इतक्यातच एक चं पुस्तक(मी म्हणीन माहिती संग्रह) वाचण्यात आला. आणि इतके प्रश्न मार्गी लागले कि स्वतःबद्दल आणि आपल्या माहिती बद्दल खूप आश्चर्य वाटला...

सगळ्यात पहिली गोष्ट, शिकंदर याची हिंदुस्थान स्वारी कधीच सफल झाली नाही. पण त्याला पुरू रजनी हरवला हे चुकीचे आहे. शिकंदर ची स्वारी जेव्हा तक्षशिलेला पोचली, तेव्हा तिथला राजा होता अंबुज नावाचा. त्याकाळी(ई. पु. ३२९) तक्षशिलेला अंबुज नावाच्या राजाचा राज्य होता. त्याकाळी हिंदुस्थान ची सीमा किंदुकुश पर्वतान पर्यंत म्हणजे सद्य स्थितीत अफगाणिस्तान च्या सिमे पर्यंत होती. पण त्या वेळी एकाचात्री अंमल नव्हता. छोटी गणराज्य होती ज्याच्यावर राज्य करणारे अनेक राजे होते. तर, या अंबुज रजनी न काही प्रतिकार करता शिकांदाराला शरण गेला आणि त्याचे सम्राटपद स्वीकारले. त्याबद्दल त्याचे पुढे अनेक वेळेला ची थू झाली. तर या राज्याला लागुनच पौरव नावाचे राज्य होते त्याचा राजा होता पौरस(पुरू). या पौरस रजनी शिकांदाराला शरण न जाता लढण्याचे ठरवले..

ती वेळ होती वर्षा ऋतू ची. सिंधू नदीच्या एका बाजूला शिकंदर आणि त्याची सेना, तर दुसऱ्या बाजुला पुरू राजा आणि त्याची सेना. पाऊस सुरु झाल्या मुले, नदी फुगली आणि दोन्ही दळ तसेच थांबून राहिले. पण शिकंदर नि नदीला उतार शोधून काढला. तेथून त्याने सर्व सैन्य पलीकडे उतरविले. आणि अचानके हल्ला केला. पुरू राजा या हल्ल्याला तयार नव्हता, तरी त्यांनी सर्व सैन्य एकवटून शिकंदर चा सामना केला. मुख्य अडचणी अश्या आल्या कि पाऊसामुळे सर्वत्र चिखल साचला होता. त्यात पुरू राजाच्या सेनेचे मुख्य बळ होते त्याचे लढाऊ हत्ती. पण चिखलामुळे हत्ती चा वेग अजूनच मंदावला आणि पायदळ पण सक्रीय होऊ शकला नाही. त्याउलट शिकंदर च्या सैन्यात मुख्य भर होता त्याचे घोड दळ. आणि घोड दळ चिखला मध्ये सुधा इतरांपेक्षा वेगाने हालचाली करू शकले. शेवटच्या घटकेपर्यंत पुरू राजा लढला पण अखेर त्याला पकडून जेरबंद करण्यात आले आणि शिकंदर समोर हजर करण्यात आले. तेव्हा शिकंदर ने त्याला विचारले कि तुला मी कसे वागवावे? तेव्हा राजा म्हणला कि राजा सारखे!! पण त्याच्या या उत्तरामुळे भारावून जाऊन शिकांदाराने राजा ला सोडून दिले हा समाज चुकीचा आहे. शिकंदर जसा धुरंदर सेनानी होता तसाच राजकारणी सुधा होता. त्याने राजा ला सोडून दिले नाही तर त्याचा राज्यपद त्याला परत दिले आणि आजू बाजूची बरेच छोटी गावे आणि गणराज्ये त्याला जोडून दिली आणि त्याची छत्रप म्हणून नेमणूक केली. या मागे त्याची मोठी राजकारणी खेळी होती ज्याचा त्याला अल्पसा का होईना पण फायदा पुढे झाला.

3 comments:

 1. सागर साहेब, विषय तुम्ही चांगला निवडला आहे आणि मांडणी देखील अतिशय वेगळ्या पद्धतीने केली आहे. आजवर हा इतिहास दुतर्फी बाजूने म्हणजे कधी सिकंदरचे गुणगान करणारा तर कधी हिंदूंचे महत्त्व ठसवणारा अशा अतिरंजित स्वरूपात मांडला गेला आहे. आज तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने या विषयाची मांडणी करून इतिहास लेखन कशा प्रकारे करावे याचा एक धडाच घालून दिला आहे. हे प्रकरण मी दोनवेळा काळजीपूर्वक वाचले. याचा शेवट काहीसा गडबडीने झाला आहे. अजून त्यात माहितीची भर हवी. अर्थात, पुढील प्रकरणात याविषयी अधिक लेखन तुम्ही केले असेल तर हि सूचना तशी आगंतुक अशा स्वरूपाची आहे पण राहवत नाही म्हणून लिहिले.

  ReplyDelete
 2. प्रथम तुमचे आभार. तुम्ही लेख वाचून मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा विषय तसा न बोलला गेलेला आहे. तरी प्रयत्न करावा म्हणून लिहिला. तुमचा विचार बरोबर आहे कि लेखाचा शेवट गडबडीत झालाय पण हा फक्त प्रकरणाचा शेवट असून, अजून प्रकरण २ आहेच. या प्रकरणात फक्त इतकाच सांगायचा होता कि हा जो समज आहे कि शिकंदर आला आणि पुरू राजानी त्याला हरविले, तो चुकीचा आहे. आता पुढच्या प्रकरणात हे स्पष्ट होईल कि शिकंदर कसा हरून हिंदुस्थानातून माघारी फिरला. त्यावरही तुमचे विचार मला जरूर लागतील.
  तुमच्या पुस्तक प्रकाशनासाठी अनेक शुभाशीर्वाद. मी एक प्रत नक्की घेईन. पुन्हा एकदा आभार.

  ReplyDelete
 3. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'सहा सोनेरी पाने' मध्ये ह्याविषयाचा संपूर्ण इतिहास पुराव्यासहित व छोट्या छोट्या घटनांसहित दिलेला आहे.
  आजकाल काही करंटे त्या पुस्तकाला विरोध करायचा प्रयत्न वगैरे करत आहेत, तरीही आपला जाज्वल्य अभिमान बाळगण्यासारखा इतिहास त्यातून समजतो.
  आपणही हे इतिहासलेखनाचे कार्य चालू ठेवावेत. शुभेच्छा !

  ReplyDelete